सी-13 डब्यातील एका काचेला तडा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. यावेळी मुर्शिदाबादला लागून असलेल्या फरक्का येथे दगड फेकण्यात आले आहेत. या दगडफेकीमुळे सी-13 कोचच्या खिडकीची काच फुटली आहे. पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी याला दुर्दैवी घटना ठरविले आहे. वंदे भारतवर दगडफेक होण्याची ही पाचवी घटना आहे. तर पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक होण्याची ही तिसरी घटना आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी बिहारच्या कटिहारनजीक वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीच्या घटनांसाठी जबाबदार समाजकंटकांना अटक करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पूर्णपणे देशातच निर्मित ही रेल्वेगाडी आंतरराष्ट्रीय स्तरीय रेल्वे प्रवासाचा अनुभव प्राप्त करून देते.