बेळगाव – हिवाळी अधिवेशनासाठी बेंगळूरहून बेळगावमध्ये आलेल्या सरकारी वाहनावर काही जणांच्या अज्ञात टोळक्याने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुवर्णसौध समोर घडल्याची माहिती उशिरा समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावमध्ये आलेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर काही जणांनी दगडफेक करून , चालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Previous Articleकबड्डी स्पर्धेत मराठी विद्या मंदिर किटवाड अव्वल
Next Article गोध्रा ट्रेन जळीतकांडातील दोषी फारुकला जामीन मंजूर