बसवनकुडची येथील नागरिकांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी रस्त्यावरच बेकायदेशीर इमारत उभी केली जात आहे. तेव्हा तातडीने महापालिका आयुक्तांना ते काम थांबविण्याची सूचना करावी, अशी मागणी बसवनकुडची येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बसवनकुडची येथील विद्यानगर येथे सदर इमारत उभारली जात आहे. बसवराज देवाप्पा करडी हे बेकायदेशीर काम करत आहेत. तेव्हा तातडीने ते काम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन दिवटे, आनंद दिवटे, संतोष चौगुले, ऍड. वाय. के. दिवटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.