Tarun Bharat

अंधश्रद्धेला खतपाणी घालून देश भरकटवणे बंद करा- राहूल गांधी

Advertisements

ऑनलाईन टिम नवी दिल्ली

हरियाणा राज्यातील सोनिपत येथिल इथेनॉल प्रोजेक्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. या कार्यक्रमात त्यांनी कॉंग्रेसने चालवलेल्या ब्लॅक फ्रायडे आंदोलनावर टिका करताना कॉंग्रेस ‘काळी जादू’ करत असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी वक्तव्य करून पंतप्रधानपदाची पातळी खालावत आहेत असा आरोप केला.

५ ऑगस्ट रोजी कॉंग्रेसने महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशभर आंदोलने केली. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रिय कॉंग्रेसने नागरिकांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट’ नावाने सुरू केलेल्या या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टिका केली होती. राष्ट्राला संबोधून केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेस काळी कपडे घालून ‘काळी जादू’ करत असल्याचा आरोप करत पक्ष चालवण्यासाठी कॉंग्रेसच्या या जादूचा काहीही उपयोग होणार नाही असे त्यांनी म्हटले होते.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या ‘काळी जादु’ या टिप्पणीवर आक्षेप घेतला. आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहीताना राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधानंना महागाई दिसत नाही काय ? पंतप्रधानांना बेरोजगारी दिसत नाही काय ? तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मोडीत काढणे आणि काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालून देश भरकटवणे बंद करा…पंतप्रधान म्हणून तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील…” असे राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटर पोस्टद्वारे म्हटले आहे.

Related Stories

राजस्थान काँग्रेसचे दबावतंत्र

Patil_p

96.2 टक्के साक्षरतेसह केरळ पुन्हा अव्वल

Patil_p

कुटुंबातील 15 जण शरयू नदीत बुडाले

Patil_p

‘स्वदेश’च्या धर्तीवर उजळविले गाव

Patil_p

अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे आज आंदोलन

Patil_p

ई-रुपीची मर्यादा वाढविली

Patil_p
error: Content is protected !!