Tarun Bharat

विद्युत विभागाचे खासगीकरण थांबवा

Advertisements

शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

विद्युत विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तो तातडीने थांबवावा, पिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱयांना द्यावी, सध्या जनावरांना लागण झालेल्या लम्पिस्कीन आजारावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱयांना कराव्यात, अशा मागण्या अखंड कर्नाटक रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार विविध क्षेत्रांचे खासगीकरण करत आहे. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. आता विद्युत विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून त्याला शेतकऱयांचा पूर्ण विरोध आहे. या खासगीकरणामुळे शेतकऱयांना वीजबिले भरावी लागणार आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तेव्हा तातडीने हे खासगीकरण रोखावे, अशी मागणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सध्या जनावरांना लम्पिस्कीनसारख्या भयानक आजाराची लागण झाली आहे. तो आजार आटोक्मयात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. ज्या शेतकऱयांची जनावरे दगावली आहेत, त्या शेतकऱयांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कलगौडा पाटील, वैजू लुमाण्णाचे, बसवराज पाटील, अमृत मुदकण्णावर, प्रकाश लोहार, बाबू पाटील, गुंडू चौगुले, चंद्राम राजाई, बाबू अलगोंडी, महादेव पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

वेटलिफ्टर अक्षता कामतीला खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण

Amit Kulkarni

बेळगावमधून धावणाऱया रेल्वेंचे वेळापत्रक

Amit Kulkarni

पाठय़पुस्तकांमध्ये कलेचा समावेश हवा

Amit Kulkarni

संरक्षक भिंतीमुळे गाळे बंदिस्त

Amit Kulkarni

अन् मृत्यू समोर होता…

Omkar B

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाटय़ाजवळ ट्रक पलटी

Amit Kulkarni
error: Content is protected !!