चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप : विहिरींचे पाणी होतेय दूषित
प्रतिनिधी /बेळगाव
नानावाडी येथील गिंडे कॉलनीत मागील आठवडाभरात चुकीच्या पद्धतीने ड्रेनेजचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला नागरिकांचा विरोध होत आहे. एका अपार्टमेंटसाठी नागरिकांचा विरोध झुगारून महानगरपालिका काम करीत आहे. हे काम तात्काळ थांबवून मोठय़ा गटारीला ड्रेनेज लाईन जोडावी, अन्यथा जुन्या गटारींची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शहराचाच भाग असणाऱया नानावाडी येथे अद्याप ना डेनेजची सोय, ना पिण्याच्या पाण्याची. नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या आहेत. मागील 40 ते 50 वर्षांपासून येथील नागरिक या विहिरींचेच पाणी पित आहेत. परंतु परिसरात बांधण्यात आलेल्या एका अपार्टमेंटचे डेनेजचे पाणी रस्त्यालगत सोडण्यात आल्याने हे पाणी मिसळून परिसरातील विहिरी दूषित झाल्या आहेत. विहिरींव्यतिरिक्त पाण्याचे दुसरे स्त्राsत नसल्याने नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे.आता त्या अपार्टमेंटला डेनेजची पाईप जोडण्यासाठी चुकीच्या बाजूने खोदाईचे काम केले जात आहे. महानगरपालिकेकडून हे काम सुरू असून उर्वरित विहिरींचेही पाणी यामुळे दूषित होणार आहे. नागरिकांनी या कामाला विरोध केला असून, मोठय़ा डेनेजच्या वाहिनीला अपार्टमेंटची डेनेज वाहिनी जोडावी, अशी मागणी करण्यात येत आहे. काम सुरूच राहिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ
नानावाडी येथील गिंडे कॉलनीत विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, काविळ या रोगांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दुर्गंधी व डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे.