Tarun Bharat

न्यायाधीशांना धमकी देणे, दबाव घालणे थांबवा

भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एच. पी. संदेश यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आपले परखड मत व्यक्त केले. त्यांनी भ्रष्टाचार करणाऱयांविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणणे, धमकी देणे असे प्रकार सुरू केले आहेत. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांच्या समर्थनार्थ भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराकडून पंतप्रधानांना पत्र पाठविण्यात आले आहे.

कर्नाटक सरकारने भ्रष्टाचारी लोकांना पाठिशी घातले आहे. हे दुर्दैव आहे. भ्रष्टाचार करताना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अधिकारी असो किंवा इतर कोणीही असो त्यांना कठीणात कठीण शिक्षा करावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली आहे.

याबाबत महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. रतन मासेकर, सुहास किल्लेकर, संजय पाटील, संतोष कांबळे, राहुल मिरजकर, सुभाष कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

खासगीकरण विरोधात पोस्ट कर्मचाऱयांची निदर्शने

Amit Kulkarni

युथ रेड क्रॉस शताब्दी इमारत बांधकामस्थळी जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटीतर्फे गुणवंतांचा गौरव

Patil_p

विनामास्क फिरणाऱयांकडून 1 लाख 72 हजारचा दंड वसूल

Patil_p

हिंडलगा, बेनकनहळ्ळी परिसरात काळा दिन गांभीर्याने

Patil_p

गुरुवारपेठ टिळकवाडी येथे रस्त्यावर टाकला जातोय कचरा

Amit Kulkarni