Tarun Bharat

प्रादेशिक आयुक्तांची बदली तातडीने थांबवा

Advertisements

भ्रष्टाचार निर्मूलन परिवार आणि इतर संघटनांची मागणी : जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव
प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रामाणिक आणि तत्पर असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्यामुळे बेळगाव बीम्स हॉस्पिटलचा विकास थांबणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्वच कामे थांबणार असून पुन्हा अधिक भ्रष्टाचाराला वाव मिळणार आहे. तेव्हा तातडीने त्यांची बदली थांबवावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार आणि इतर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, ॲड.एन.आर.लातूर,शिवाजी सुंठकर, पी. एल. पावशे, मुक्तार इनामदार, कल्लाप्पा पाटील,किसन सुंठकर,संतोष कांबळे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

हावेरीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, ६ कोविड केअर सेंटर बंद

Abhijeet Shinde

मेरडा गावच्या महाबळेश्वर पाटील यांना वाढता पाठिंबा

Patil_p

महालक्ष्मी ओटी भरणे कार्यक्रम मजगावात उत्साहात

Amit Kulkarni

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Patil_p

आर्ट्स सर्कलच्या 2020 सालच्या स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

एपीएमसी बाजारात टोमॅटो-भेंडी दरात घट

Amit Kulkarni
error: Content is protected !!