गृहनिर्माण क्षेत्रावर भरविलेले एकमेव प्रदर्शन : चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी : प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस
प्रतिनिधी /बेळगाव
गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली असे ब्रिद वाक्मय घेऊन सुरू असणाऱया तरुण भारत ‘घरकुल 2022’ या प्रदर्शनाला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. सोमवारी प्रदर्शन पाहण्यासाठी तुडूंब गर्दी झाली होती. बेळगावसह गोवा, कोकण व कोल्हापूर भागातून नागरिक दाखल झाले होते.
तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या सहकार्याने घरकुल 2022 प्रदर्शन सुरू आहे. सीपीएड मैदानावर 30 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. घराच्या बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. अशाप्रकारे गृहनिर्माण क्षेत्रावर भरविले जाणारे हे एकमेव प्रदर्शन आहे. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी बेळगावसह आसपासच्या जिल्हय़ातील नागरिकांची गर्दी होत आहे.
घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट, प्लायवूड, डिझायनर खिडक्मया, दारे, लोखंडी अत्याधुनिक खिडक्मया, फायबरमधील तयार साहित्य, इंटिरियर फर्निचर, सोफासेट, होम लोन, फायनान्स, सोलार, टाईल्स, बंब यासह इतर साहित्य विक्री केले जात आहे. त्याचबरोबर गृहोपयोगी साहित्य, साडय़ा, डेस, दागिने खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. मागील दोन दिवसात पावसाने व्यत्यय आणला होता. परंतु सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने तुफान गर्दी झाली होती.
चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद
गृहनिर्माणासोबतच चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे. चायनिज, चटपटीत, केक, आइस्क्रिम यासारखे पदार्थ खाण्यासाठी पसंती दिली जात आहे. भेलपुरी, शेवपुरी, गिरमिट, उसाचा रस, आलेपाक, मिरची भजी, कोल्हापुरी झणझणीत भेळ, मसाला चहा, मोमोज, चायनिज पदार्थ, दावणगेरी डोसा, आइस्क्रिम, फायर पिझ्झा यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला जात आहे.
डान्स स्पर्धकांनी तरुणाईला थिरकविले
बीएससी टेक्स्टाईल मॉल पुरस्कृत सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा सोमवारी पार पडली. बेळगाव परिसरातील युवा डान्सर्सनी एकाहून एक सरस असे डान्स सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. हिंदी, मराठी व कन्नड गीतांवर डान्स सादर करून तरुणाईला थिरकायला लावले. उत्तम नृत्य केलेल्या स्पर्धकांना बीएससी टेक्स्टाईल मॉलतर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.