जगातील विविध मानव समुदायांमधील अनेक परंपरा अत्यंत विचित्र किंवा आश्चर्यकारक असू शकतात. कित्येक प्रथा तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या असतात. विशेषतः शुभ-अशुभ या संकल्पना तर प्रत्येक मानव समुदायात वेगवेगळय़ा प्रकारे आढळतात. एखादी प्रथा एखाद्या समुदायात शुभ तर अन्य समुदायात अशुभ मानली जाऊ शकते. आफ्रिकेमध्ये अशीच एक प्रथा आहे.
सर्वसाधारणपणे आपण थुंकणे हे असभ्य किंवा अशुभ मानतो. पण आफ्रिकेतील एका आदिवासी समुदायात घरी आलेल्या अतिथींवर थुंकण्याची प्रथा आहे. या प्रथेतून अतिथींबरोबर आलेल्या नवजात बालकांनाही सोडले जात नाही. अशा तऱहेचे थुंकणे या जमातीत अत्यंत शुभ मानले जाते. या जमातीचे नाव मसाई असे आहे. या जमातीत ही प्रथा सहस्रावधी वर्षांपासून असल्याचे सांगण्यात येते. ही जमात केनिया आणि टांझानिया या देशांच्या काही भागांमध्ये रहात आहे. अतिथींचे फूल देऊन किंवा अन्य कोणत्या तरी सभ्य समजल्या जाणाऱया कृतीने स्वागत करणे येथे अशुभ मानले जाते. त्याऐवजी अतिथींच्या अंगावर थुंकून त्यांना घरात घेणे याचा अर्थ त्यांना पवित्र करणे असा आहे. या जमातीची लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे. ही भटकी जमात असून बहुतेक वेळेला एका जागी स्थिर रहात नाही. यांची घरे देखील लाकूड किंवा पाने अशा हलक्मया वस्तूंपासून बनविलेली असतात. लाल रंगाची वस्त्रs हे या जमातीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. जनावरांचे मांस खाण्याबरोबरच त्यांचे रक्त पिण्याचीही त्यांची परंपरा आहे.