Tarun Bharat

हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर ; असा करा आहारात समावेश करा

Strawberries For Heart: बदलती जीवनशैली आणि फास्टफुडमुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.यापैकी एक म्हणजे हृदयरोग. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हृदयच्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराची दिनचर्या ठरवणे खूप गरजेचे आहे. नियमित आहारात प्रोटीन, कॅल्शिअम, कर्बोदके,असणे गरजेचे आहे. पौष्टिक घटकांनी युक्त अन्न हृदय निरोगी ठेवते आणि इतर अनेक आजारांपासून बचाव करते. तुम्ही सीझननुसार फळांतचा समावेश देखील आहारात करणे गरजेचे आहे. थंडीच्या मोसमात बाजारात सध्या स्ट्रॉबेरी पाहायला मिळतेय. तुम्ही आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. स्ट्रॉबेरी हृदयासाठी किती फायदेशीर आहे आणि त्यांचा आहारात कोणत्या प्रकारे समावेश केला जाऊ शकतो हे जाणून घेऊया.

संशोधनानुसार स्ट्रॉबेरी हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.यामध्ये भरपूर फायबर,अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.तसेच पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फॉस्फरस सारखे घटक त्यात आढळतात.यामध्ये असलेले नायट्रेट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. आंबट-गोड स्ट्रॉबेरी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते, शिवाय खायला ही चविष्ट आणि आरोग्यदायी असते. तुम्ही नियमितपणे मर्यादित प्रमाणात स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास,तुम्ही हृदयाशी संबंधित आजार टाळू शकता.

हृदयाच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरीचा आहारात अशा प्रकारे करा समावेश

सॅलडमध्ये वापरा
जर तुम्हाला सॅलडमध्ये गोड आणि आंबट चव घ्यायची असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी घालून सॅलड तयार करू शकता. ते बनवण्यासाठी तुम्ही इतर फळे आणि भाज्या जसे की काकडी, हिरवी कोथंबीर देखील घालू शकता.

स्ट्रॉबेरी रस
स्ट्रॉबेरीचा रस चवीसोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.स्ट्रॉबेरीच्या रसामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची इतर फळे देखील घालू शकता.

रायता
स्ट्रॉबेरी रायता चवीला अतिशय रुचकर आहे त्याची टेस्ट आंबट-गोड असते आणि तुम्ही ती जेवणासोबत सर्व्ह करू शकता.त्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात.

स्मूदी
जर तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूसचे चाहते नसाल तर तुम्ही त्यातून स्वादिष्ट मिल्कशेक किंवा स्मूदी देखील बनवू शकता.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी वापरून तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता.

Related Stories

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

Omkar B

आयुर्वेदीक शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

Abhijeet Khandekar

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Kalyani Amanagi

आरोग्यासाठी लाभदायी ‘बीट’; काय आहेत फायदे वाचा…

Archana Banage

पोह्याचे खमंग व खुसखुशीत थालीपीठ; जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

Back Pain : पाठदुखीने त्रस्त आहात, या छोट्या ट्रिक्स वापरून पाहा

Archana Banage