बेळगाव प्रतिनिधी – शुल्लक कारणावरून कॅम्प येथील एका मुलावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अनंतशयन गल्लीजवळ हि घटना घडली असून या घटनेनंतर काहि काळ तणाव निर्माण झाला होता. फरान धारवाडकर (वय 15) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारसायकलवरून जाताना तरुणांच्या दोन गटात अंबाभुवनजवळ झालेल्या वादावादीनंतर हि घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे ए सीपी ए.चंद्राप्पा खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकार्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. जखमी मुलाची भेट घेऊन घटनेची माहिती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. हा हल्ला कोणी केला? याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा झाला नाहि. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
Trending
- ओलमणी येथील गटारीतील कचरा उचल करण्याकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष
- मतदान जागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
- एक्स्ट्रीम संघाकडे निधी वॉरियर्स चषक
- एसकेई प्लॅटिनम मैदानाला निखील भुसद यांची भेट
- मुतगा कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात
- पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान
- लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय
- अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला