काही मार्गांवरील बसेस रद्द : काही बसेस दौऱ्यासाठी सज्ज
प्रतिनिधी/ बेळगाव
पंतप्रधान सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान जाहीर सभा आणि रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून कार्यकर्ते बेळगावात दाखल होणार आहेत. यासाठी परिवहनच्या 350 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, खानापूर आगारातील बससेचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारी काही भागातील बससेवा तात्पुरती रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनने पत्रकाद्वारे दिली आहे.
बेळगाव आगारातून कोल्हापूर, हुबळी, धारवाड, विजापूर, गु•ापूर, बिडी, नेसरगी, गोकाक, हिडकल, पाच्छापूर, बैंलहोंगल यासह शहरांतर्गत अनगोळ, वडगाव, मजगाव, वंटमुरी, कणबर्गी, रणकुंडये, चंदनहोसूर, सुळेभावी, राणी चन्नम्मा विद्यापीठ, होनगा, येळ्ळूर, उचगाव, कल्लेहोळ आदी भागातील बससेवा रद्द केली जाणार आहे.
बैलहोंगल आगारातील बेळगाव, धारवाड, यरगट्टी, मुनवळ्ळी, नेसरगी, इटगी रोड, कित्तूर, हुळी नागलापूर, पट्टीहाळ, सवटगी, अंबडगट्टी, येळेपट्टी, तुरमुरी भागातील बससेवा ठप्प होणार आहे.
रामदुर्ग आगारातील बेळगाव, मळ्ळीकेरी, हिरेकोप्प, होसूर, कोन्नूर, मुलंगी, यादवाड, अनवाळ, लकेनायकनकोप्प, र•sतिम्मापूर, गोणगन्नूर, गोडची, मुनवळ्ळी, यरगट्टी, हुलकुंद, कुळगेरी, कम्मकेरी, केऊर आदी भागातील बससेवेवर परिणाम होणार आहे. खानापूर आगारातून बेळगाव, इटगी क्रॉस, बिदरभावी, चिखले, पारवाड, फोंडा, बिडी, कित्तूर आदी भागात धावणाऱ्या गाड्या बंद राहणार आहेत.
शहरातील काही भागात बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल होणार आहे. परिणामी बसव्यवस्थाही विस्कळीत होणार आहे. तर इतर ठिकाणी बससेवा सुरळीत सुरू राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी परिवहन घेणार आहे.