राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची अधिकाऱयांना सूचना : अद्याप 61 धाडीत 1 लाख 20 हजार दंड जमा
प्रतिनिधी / बेळगाव
जुलैपासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची सूचना कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शांत थिम्मय्या यांनी केली. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यास प्लास्टिकचा वापर हानिकारक ठरत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक बंदीची कारवाई करावी, असे आवाहन केले.
देशभरात प्लास्टिक बंदी करण्याचा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावला आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शांत थिम्मय्या बेळगाव दौऱयावर आले आहेत. गुरुवारी महापालिका कार्यालयात जिल्हय़ातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱयांसह आयुक्तांची बैठक घेतली. यावेळी जिल्हय़ातील प्लास्टिकविरोधी कारवाईचा आढावा घेतला. जिल्हय़ात ठिकठिकाणी धाडसत्र राबवून कारवाई करण्यात आली आहे. मुख्यतः प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणाऱयांवर कारवाई करून नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर काही व्यावसायिकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई अद्यापही गांभीर्याने होत नसल्याचे डॉ. थिम्मय्या यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात बैठका घेऊन या कारवाईचा आढावा घेतला जात आहे. तर यापुढेही या मोहिमेची माहिती सातत्याने घेतली जाईल. लोकसंख्या वाढत असल्याने प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. प्लास्टिकचा वापर आरोग्यासाठी हानिकारक असून पर्यावरणालाही धोकादायक आहे. त्यामुळे केंद्रीय नियंत्रण मंडळाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे. याची कारवाई करण्यासाठी जागृती मोहीम राबविण्यात यावी, प्लास्टिकचा वापर करणाऱयांना नोटीस बजावून कारवाई करावी, असे सांगितले. प्रत्येक अधिकाऱयांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच प्लास्टिक बंदीसाठी आवश्यक कारवाई करावी, अशा सूचना केल्या.
यावेळी बेळगाव मनपाने राबविलेल्या प्लास्टिकविरोधी कारवाईची माहिती पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी दिली. आतापर्यंत महिन्याभरात 61 ठिकाणी धाडी टाकल्या असून 1 लाख 20 हजार दंड जमा केला आहे. तसेच 200 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त केले असल्याचे सांगितले.
सिंगल यूज प्लास्किटची विक्री बंद करण्यात आली आहे. पण शासनाच्या मार्गसूचीनुसार पुनर्वापर करण्यात येणाऱया 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याने याची विक्री केली जात असल्याचे प्लास्टिक विपेते संघाच्यावतीने रमेश पावले यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त रुदेश घाळी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी वरि÷ पर्यावरण अधिकारी पुरोहित, डीयुडीसी बेळगावचे प्रोजेक्ट डायरेक्टर ईश्वरप्पा उळागड्डी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जगदीश एच. आय. आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.