प्रतिनिधी /फोंडा
गोव्यात मद्यपानाने होणारे जीवघेणे अपघात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊ वाहन चालविणाऱयाविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. फोंडा येथील नवीन कदंबा बसस्थानकावर प्रवासी बसच्या चालकांना अल्कोमिटर चाचणी काल शुक्रवारी दुपारी करण्यात आली. फोंडा वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी 2 ऑगस्टपासून विशेष जागृत ाr मोहीम हाती घेतलेली आहे. चार दिवसात 20 जणांविरोधात कारवाई केलेली आहे. जानेवारी ते जुलै पर्यंत एकूण 80 जणांविरोधात कारवाई केलेली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले वाहनचालकांनी सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम पाळावेत, नियमाचे उल्लंघन करू नका. दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे. नवीन मोटर कायद्याअंतर्गत मद्यपान करून वाहन हाकणाऱयाविरोधात रू. 10 हजार दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावास होऊ शकतो. तसेच प्रकरणी न्यायालयात जाऊन दंड भरावा लागतो. याप्रकरणी 74 जणांचे वाहन परवाने निलंबनसाठी आरटीओकडे वर्गीकृत करण्यात आले आहे.