Tarun Bharat

रेल्वेस्थानकावर कडक बंदोबस्त

Advertisements

प्रवाशांची गैरसोय : रेल्वेस्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप

प्रतिनिधी /बेळगाव

अग्निपथ योजनेच्याविरोधात रेल्वेस्थानक परिसरात आंदोलन होण्याची शक्मयता होती. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोगटे सर्कलपासून ते पोस्टमन सर्कलपर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. या परिसरात येणाऱया प्रत्येक तरुणाची कसून चौकशी करण्यात येत होती. परंतु या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांसोबत आलेल्या नातेवाईकांना दूरवर वाहने थांबवावी लागली. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातील तरुणांमधून विरोध करण्यात येत आहे. सोमवारी बेळगावमधील युवक निदर्शने करण्याची शक्मयता असल्याने रेल्वे परिसरात कोणतेही नुकसान होऊ नये, याची खबरदारी रेल्वे व स्थानिक पोलिसांनी घेतली. प्रवाशांकडे रेल्वे तिकीट, आधारकार्ड असेल तरच रेल्वेस्थानक परिसरात सोडले जात होते. तसेच गोगटे सर्कल येथून रेल्वेस्थानकावर जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. तर पोस्टमन सर्कल येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता.

विविध ठिकाणी वादावादीचे प्रकार

रेल्वेस्थानक परिसराला सोमवारी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रेल्वेस्थानकाच्या बाहेर स्थानिक पोलीस तर स्थानकावर रेल्वे पोलीस प्रत्येकाची चौकशी करीत होते. या सर्वाचा फटका कारवार बसस्थानक व हेस्कॉम कार्यालयात येणाऱया नागरिकांना बसला. बऱयाच नागरिकांना पोलिसांनी सोडले नसल्याने वादावादीचे प्रकार घडत होते.

बेळगाव बंदची हाक कोणी दिली?

निदर्शने करण्यासाठी आलेले 250 तरुण ताब्यात : शहरातील व्यवहार सुरळीत

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली होती. बंदची हाक कोणी दिली? कोणत्या संघटनेने बंदचे आयोजन केले होते? याची कसलीच माहिती बाहेर पडली नाही. पोलीस दलाने मात्र गांभीर्याने दखल घेत निदर्शने करण्यासाठी आलेल्या 250 तरुणांना ताब्यात घेऊन सायंकाळी त्यांची सुटका केली.

गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या व जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरि÷ अधिकारी बेकायदा बंद होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. बेळगावात पथसंचलन करण्यात आले. जलदकृती दलाची एक तुकडी मागविण्यात आली. पोलिसांवर शक्तिप्रदर्शनाची वेळ का आली? याचा उलगडा झाला नाही.

सोमवारी विविध कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱयावर आले आहेत. दिवसभरात बेंगळूर येथे वेगवेगळय़ा कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. याचवेळी कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात अग्निपथला विरोध होत असल्याचे दाखविण्यासाठी कोणी तरी पडद्यामागे राहून बंदचे नियोजन केले होते. याची माहिती मिळताच वरि÷ पातळीवरून हालचाली होऊन पोलीस यंत्रणा कामाला लागली.

जिल्हय़ात ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करून वाहनांची तपासणी करण्यात आली. बेळगाव शहराला तर सोमवारी सकाळपासून अक्षरशः छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. सायंकाळपर्यंत 250 तरुणांना ताब्यात घेऊन मार्केटयार्ड येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रात ठेवले.

जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आदी वरि÷ अधिकाऱयांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन त्या तरुणांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱयांनी तरुणांचे गाऱहाणे ऐकले. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. दिवसभर शहरातील व्यवहार सुरळीतपणे चालले. बेळगाव बंद प्रयत्नपूर्वक थोपविल्याचा दावा पोलीस अधिकारी करीत असले तरी बंदची हाक कोणी दिली होती? यासंबंधी कसलीच माहिती बाहेर पडली नाही. 

Related Stories

भारत युवक मंडळाच्यावतीने स्वा.सावरकर जयंती साजरी

Amit Kulkarni

जि.पं.च्या निधीत कोणाचाही हस्तक्षेप नको

Amit Kulkarni

शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या

Amit Kulkarni

जलवाहिनीच्या कामामुळे वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

नंदगड-गवळीवाडा रस्त्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर

Amit Kulkarni

पोलीस भरती परीक्षेत ‘हायटेक कॉपी’चे प्रकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!