Tarun Bharat

डेंग्यू नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न

डेंग्यू नियंत्रण नोडल अधिकारी डॉ. कल्पना महात्मे : सत्तरी तालुक्मयातील अनेक गावांमध्ये संक्रमण : कृषी, जलसिंचन खात्याच्या कर्मचाऱयांची मदत घेणार 

प्रतिनिधी /वाळपई

Advertisements

सत्तरी तालुक्मयात वाढणाऱया डेंग्यूच्या रुग्णावर नियंत्रण आणण्यासाठी जलसिंचन खाते व कृषी खात्याच्या कर्मचाऱयांची मदत घेण्यात येणार आहे. या कर्मचाऱयांच्या मदतीने वेगवेगळय़ा ठिकाणी फवारणी व ज्याठिकाणी पाण्याचा साठा होत आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या सत्तरी तालुक्मयात डेंग्यू रुग्ण संख्या 70 वर पोहोचली आहे. येणाऱया काळात ती नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे डेंग्यू नियंत्रण नोडल ऑफिसर डॉ. कल्पना महात्मे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सत्तरी तालुक्मयातील 50 टक्के गावांत डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱया बाजूने आरोग्य खाते नियंत्रण राखण्यासाठी जोरदार उपाययोजना करत आहे. फवारणी करणे व ज्या ठिकाणी पाण्याचा साठा झालेला आहे तो दूर करण्यासाठी कर्मचारी वेगवेगळय़ा भागांमध्ये फिरत असल्याचे यावेळी डॉ. महात्मे यांनी स्पष्ट केले.

मे महिन्यापासून सत्तरी तालुक्मयात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास सुरुवात झाली. सध्या या रुग्णांची संख्या 70 वर पोहचलेली आहे. यामुळे नागरिकात काही गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात डॉक्टर महात्मे यांच्याशी संपर्क साधला असता, भीती बाळगण्याची गरज नाही. ज्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत त्याचप्रमाणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  सरकारी सामाजिक रुग्णालयाच्या वतीने वेगवेगळय़ा ठिकाणी उपायोजना करण्यात आलेले आहेत. अनेक गावांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे.

वाढत्या रुग्ण संख्येबाबत त्यांचे लक्ष वेधले असता, यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये जलसिंचन खाते व कृषी खात्याच्या कर्मचाऱयांची मदत मिळणार असून कृषी खात्याचे कर्मचारी वेगवेगळय़ा कृषी बागायतीमध्ये फिरून त्या ठिकाणी पाण्याचा साठा होणार नाही, याची विशेष दखल घेणार आहेत. या कामाला सुरुवात झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्यातरी सदर कर्मचारी अनेक भागांमध्ये सातत्याने भेटी देत आहेत.

दुसऱया बाजूने जलसिंचन खात्याचे कर्मचारी पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याचा साठा होणार नाही. यामध्ये विशेष लक्ष देत आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा झालेला आहे. त्या ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. यामुळे सदर पाण्यामध्ये जंतूंची निर्मिती होणार नाही याची विशेष दखल घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सत्तरी तालुक्मयातील वाढत्या डेंग्यू रुग्ण संदर्भात बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. ज्या पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहे. त्या पद्धतीने उपाययोजनांवर आतापर्यंत भर देण्यात आलेली आहे. यामुळे कोणत्याही स्तरावर यासंदर्भात निष्काळजीपणा करण्यात आलेला नाही.

प्रामुख्याने औषधांच्या फवारणीवर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औषध फवारणी वेगवेगळय़ा ठिकाणी करण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये सुरुवातीपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचठिकाणी किरकोळ रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे ज्या गावांमध्ये डेंग्यू रुग्णांचे संक्रमण वाढलेले आहे. त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत असून कायमस्वरूपी उपायोजना करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे डॉ. महात्मे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

सांतिइस्तेव्ह माशेल पुलाखाली इसमाचा निघृणरित्या खून

Amit Kulkarni

नाणूस ते गांजे रस्त्यावर ‘खड्डे आमच्या नशिबी’ प्रवास सुटणार कधी?

Amit Kulkarni

‘फोमेन्तो’ने हटविलेले 219 कामगार मदतीपासून वंचित

Omkar B

आमदार रोहन खंवटेना भाजपात प्रवेश नको

Amit Kulkarni

वे. प्रभाकरशास्त्री बाक्रे यांचे निधन

Amit Kulkarni

नेत्रावळीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची दखल

Patil_p
error: Content is protected !!