कोलकाता
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 130 टक्के इतकी वाढ दिसली आहे. जून 2022 च्या तिमाहीअखेर कंपनीने 1036 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वषी समान तिमाहीमध्ये कंपनीने 475 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. याचाच अर्थ नफ्यामध्ये घसघशीत अशी 130 टक्के वाढ नोंदली गेली आहे. एवढेच नव्हे तर कंपनीच्या महसूलामध्येही 51 टक्के वाढ होत तो 26 हजार 512 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वषी समान अवधीमध्ये हाच महसूल 17 हजार 776 कोटी रुपये इतका होता.