स्थानिकांनी पाण्यासाठी नदी पात्रात केले जलआंदोलन : स्थानिकासोबत राहाणार : आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आश्वासन
प्रतिनिधी /पेडणे
बैलपार-कासारवर्णे येथील नदीकिनारी जलसिंचन खात्यातर्फे 27 कोटी रुपये खर्चून पाणी प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी दोन पाणी पंप बसविण्याचे काम जोमात सुरू आहे. याप्रकल्पामुळे कासारवर्णे परिसरासह पेडणे तालुक्यात भविष्यात गंभीर पाणी समस्या निर्माण होऊ शकते. हे लक्षात या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. रविवारी 1 रोजी नदी पात्रात बसून जलआंदोलन करून सरकारच्या कृतीचा आणि संबंधित यंत्रणेचा नागरिकांनी निषेध केला .
चांदेल पाणी प्रकल्पसाठी जलसिंचन खात्यातर्फे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्या प्रकल्पाचे मोपा विमानतळ व पाणी चांदेल प्रकल्प तसेच येथील विविध प्रकल्पासाठी पुरविण्यात येणार आहे. असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हे पाणी खागी कंपन्या तसेच मोपा विमानतळ आणि अन्य व्यावसायिकांना देण्याचा घाट सरकार घालत आहे. असा आरोप यावेळी करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.
या प्रकल्पाद्वारे बैलपार नदीचे पाणी पाच एम. एल. डी हे मोपा विमानतळासाठी , पंधरा एमएलडी पाणी हे चांदेल प्रकल्पासाठी तर तीस एमएलडी पाणी हे तुये येथे होऊ घातलेल्या नवीन पाणी प्रकल्पासाठी देण्यात येणार असल्याची माहिती जलसिंचन खात्याचे अधिकारी प्रमोद बदामी यांनी दिली होती. मात्र स्थानिक नागरिक तसेच विविध संघटना यांनी या प्रकल्पावर संशय व्यक्त करून हे पाणी इतरत्र वळवण्याची शक्यता असून हे पाणी इतरत्र हलवले तर भविष्यात पेडणे तालुक्मयात पाण्याची तीव्र टंचाई भासेल. अशी भीती वाटत असल्याने अनेक दिवस हे नागरी या येथील पंप हाऊस विरोध करत आहेत.
रविवारी त्यांनी येथील प्रकल्प सुरू आहे त्या ठिकाणी नदीत ठिंया मारत आंदोलन केले.
मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित संघटनेचे अध्यक्ष भरत बागकर, उपाध्यक्ष भरत बागकर भास्कर नारूलकर, उदय महाले, करिश्मा गाड ज्ये÷ नागरिक बाबुराव गाड रमाकांत तुळसकर, गोंयचो आवाज संघटनेचे निमंत्रक स्वप्नेश शेर्लेकर यांनी या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगून लोकप्रतिनिधी आणि आमदार यांनी यात विशेष लक्ष घालून आमची समस्या सोडवावी अशी मागणी केली. या प्रकल्पाला कायदेशीर मार्गाने विरोध करणार असल्याचे ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले. यावेळी देऊ राहुल, महेश तुळसकर, मिथिलेश नाईक, संजय आरोसकर, मेघशाम नाईक, आचल गाड, प्रतीक्षा गाड, अतिश गाड आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जलसिंचन अधिकारी, आंदोलनकर्त्यांची बैठक घेणार : आर्लेकर
पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या प्रकल्पाबाबत आपण आंदोलक व संबंधित जलसिंचन खात्याचे अधिकारी यांची बैठका घेऊन चर्चा करणार. यामध्ये योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर पाणी प्रकल्प लोकहिताचा नसेल तर आपण लोकांसोबत असणार, आमदार आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.