Tarun Bharat

सेन्सेक्सची 379 अंकांची मजबूत स्थिती

Advertisements

निफ्टी 17,800 अंकांवर ः तेल व गॅस, बँका व वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत

मुंबई ः 

चालू आठवडय़ातील पहिला दिवस हा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजार बंद होता. भारतीय भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात मंगळवारच्या दिवशी तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स्ने तब्बल 379 अंकांची झेप घेतली आहे. यामध्ये तेल व गॅस, बँका, तसेच वाहन कंपन्यांच्या सकारात्मक कामगिरीमुळे बाजारात मजबूत स्थिती राहिली होती.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारी 379.43 अंकांनी म्हणजे 0.64 टक्क्यांनी वाढत जात निर्देशांक 59,842.21 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127.10 अंकांसह 0.72 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,825.25 वर बंद झाला आहे. यामध्ये काही काळ सेन्सेक्सने 460.25 अंकांची झेप घेतली होती.

जुलै महिन्यात घाऊक महागाई 13.93 टक्क्यांसह या पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर आल्याने महागाईची चिंता कमी झाली आहे. यासोबतच निर्देशांकात मजबूत भागीदारी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागातील खरेदीने बाजाराला साथ दिली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

 चलनवाढीचा दबाव कमी होत असल्याने देशातील गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक पुनरुद्धाराबाबत सकारात्मक मत तयार झाले आहे. यामध्ये ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) चा आकडा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला राहिला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरवाढीचा वेग स्थिर करु शकतो असा अंदाज यावेळी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

सेन्सेक्समधील समभागात महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग प्रामुख्याने नफा कमाईत राहिले आहेत. दुसरीकडे भारतीय स्टेट बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टाटा कसंल्टन्सी सर्व्हिस आणि एनटीपीसी या कंपन्यांचा समावेश हा नुकसानीत राहिला आहे.

जागतिक पातळीवर अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी व चीनचा शांघाय कम्पोजिट लाभात तर जपानचा निक्की तसेच हाँगकॉँगचा हँगसेंग नुकसानीत राहिला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.86 टक्क्यांनी घसरुन 94.28 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.

Related Stories

लस निर्मितीचा मोदींनी घेतला आढावा

Patil_p

गुणवत्तेसोबत आरक्षणही आवश्यक

Amit Kulkarni

IAS टॉपर टीना डाबी -अतहर आमीर अखेर विभक्त; न्यायलयाकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब

Abhijeet Shinde

स्विगी करणार 350 जणांची कपात

Patil_p

सौर वादळ कोणत्याही क्षणी पृथ्वीवर

datta jadhav

काँग्रेस सत्तेवर आल्यास पंजाबची सुरक्षा धोक्यात

Patil_p
error: Content is protected !!