Tarun Bharat

महिंद्रा स्कॉर्पियो-एनच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Advertisements

किंमत 12 लाखापुढे ः केवळ 30 मिनिटातच 1 लाख गाडय़ा झाल्या बुक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पियो-एन बुकिंगला ग्राहकांनी दमदार प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. केवळ 30 मिनीटातच एक लाखहून अधिक गाडय़ा ग्राहकांनी बुक केल्याची माहिती आहे.

महिंद्रा कंपनीची नवीन स्कॉर्पियो एन बुकिंगकरता नुकतीच खुली झाली असून पहिल्या 30 मिनिटामध्ये एक लाख गाडय़ा लोकांनी बुकींग केल्या आहेत. नव्या स्कॉर्पियो एनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाने कंपनी अधिक आनंदीत झाली आहे. बुकिंग सुरू झाल्याच्या एक मिनिटांमध्ये जवळपास 25 हजार जणांनी सदरची गाडी बुक केली असल्याचेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून

सदरच्या नव्या महिंद्रा स्कॉर्पियो एन गाडीची डिलिव्हरी 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले असून डिसेंबर 2022 पर्यंत 20 हजारांहून जादा गाडय़ांची डिलिव्हरी करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत ग्राहकांना त्यांच्या गाडी डिलिव्हरीची तारीख सांगितली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या गाडीकरता बुकिंग किंमत ही 21 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

किंमत किती

स्कॉर्पियो एन बेस श्रेणीतील गाडीची किंमत ही साधारणपणे 12 लाख रुपये (एक्सशोरूम) असणार असून यामधील उच्चतम श्रेणीच्या गाडीची किंमत ही साधारण 21 लाख 45 हजार रुपयापर्यंत (एक्सशोरूम) असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. स्कॉर्पियो एन ही गाडी 27 जून रोजी बाजारामध्ये लाँच केली होती. या गाडीमध्ये सनरुफची सोय असणार आहे. जुन्या गाडीच्या तुलनेमध्ये या नव्या गाडीचे डिझाईन वेगळे आणि आकर्षक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून मागच्या गाडीपेक्षा या गाडीचा आकार काहीसा मोठा आहे. अनेकविध वैशिष्टय़े या गाडीमध्ये समाविष्ट केली गेली आहेत. सदरची गाडी बाजारामध्ये टाटा सफारी व जीप कॅम्पस यासारख्या गाडय़ांना टक्कर देणार असल्याचे सांगितले जात आहे.

……………….

Related Stories

रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले

Amit Kulkarni

सुझुकीचा 10 लाख उत्पादनाचा टप्पा पार

Patil_p

कार्सवर सवलत मिळण्याची आशा धुसर

Patil_p

दोन अंकी विकासाची ‘हय़ुंडाई’ला आशा

Patil_p

आगामी वर्षात विक्रीत सुधारणा : ऑडी

Patil_p

‘अपाचे’ची जागतिक विक्री 40 लाखापार

Patil_p
error: Content is protected !!