लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील प्रकार
वृत्तसंस्था/ जालंधर
चंदीगड विद्यापीठातील एमएएमस प्रकरण अद्याप चर्चेत असताना जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत गोंधळ उडाला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. केरळचा रहिवासी असलेल्या इजिन एस. दिलीप कुमारच्या खोलीतून सुसाइड नोट देखील मिळाली आहे. आत्महत्येची माहिती कळताच विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांकडून होणारा गोंधळ न थांबल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला असून यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.