बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत जागृती
प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचा एमबीए विभाग, कर्नाटक स्टेट कौन्सिल फॉर सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी ऍण्ड इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेंगळूर येथील विवेकानंद सागर व नागार्जुन एम. जी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्यवस्थापन आणि इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराबाबत जागरुकता व्हावी, कॉपीराईट, पेटंट, टेडमार्क याविषयी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर म्हणाले, संशोधनाचे पेटंटमधील रुपांतर या कार्यक्रमाद्वारे समजावून दिले जाणार आहे. विभागप्रमुख डॉ. के. एस. एल. दास म्हणाले, नवसंशोधन क्षेत्रात देशाने मोठी प्रगती केली असून, विद्यार्थ्यांना याची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल, असे सांगितले. गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन प्रमोद कटवी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला. डॉ. गोविंदराज माने व डॉ. अमित चाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.