Tarun Bharat

अज्ञाताकडून विद्यार्थ्याची चौकशी; हायस्कूलमध्ये खळबळ

Advertisements

विद्यार्थी शाळेत आला नसल्याने संभाव्य धोका टळला

प्रतिनिधी/ डिचोली

  सांखळी येथील एका हायस्कुलमध्ये पाचवीत शिकणाऱया एका मुलाला नेण्यासाठी कोणीतरी अज्ञात व्यक्ती आल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करावाच. तसेच शाळांच्या परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱया व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

  उपलब्ध माहितीनुसार काल शनिवारी दि. 24 रोजी सकाळी सांखळी शहरातील एका हायस्कूलमध्ये 25 वयोगटातली दोन युवक आले व त्यांनी एका विद्यार्थ्याचे नाव घेत त्याला नेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यावर हायस्कूलमधून दीड वाजता शाळा सुटणार असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकल्यावर ते दोघेही निघून गेले.

  त्यानंतर दुपारी त्याच विद्यार्थ्याची आई आपल्या दुसऱया मुलाला शाळेतून नेण्यासाठी आली असता शाळेतील शिक्षक व इतरांनी तिला अज्ञाताला मुलाला नेण्यासाठी पाठविण्याबाबत विचारले. त्यावर आपल्या पाचवीतील विद्यार्थ्याला हायस्कूलमध्ये पाठवलेच नाही तो आजारी असल्याने त्याला डॉक्टरांकडे नेल्याची माहिती दिली. तसेच आपण कोणालाही त्याला नेण्यासाठी पाठविले नव्हते, असा खुलासा दिला.

तिच्या या माहितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आणि हे प्रकरण संशयास्पद असल्याची जाणीव झाली. त्यावरून हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेने  त्वरित पोलिसांना माहिती दिली. सांखळी पोलीस आऊट पोस्टवरील पोलिसांनी येऊन हायस्कूलमध्ये सीसीटिव्ही फुटेज तपासले. मात्र सदर सीसीटिव्ही फुटेजमध्ये काहीच सापडले नाही. सदर अज्ञात युवकांची छबीही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक काही माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. तरीही पोलिसांनी त्यांचा प्रत्यक्षदर्शींकडून चेहरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

शाळा परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱयांची चौकशी करा

  हे वृत्त सांखळी परिसरात पसरल्यानंतर एकच खळबळ माजली. पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाची चौकशी करून सदर अज्ञात दोन युवक कोण याचा शोध घ्यावा. तसेच शहरातील हायस्कुलच्या परिसरात कोणी संशयास्पद फिरत असल्यास त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे

Related Stories

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात योगदान द्या

Patil_p

चोरलेल्या दुचाकीचा तपास लावण्यात वेर्णा पोलिसांना यश

Patil_p

माशेल चिमुलवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेला कपाट व पुस्तके

Amit Kulkarni

वास्कोतील अपघातात पादचारी ठार

Amit Kulkarni

धावे तार भागातील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

Amit Kulkarni

गोव्याच्या मासिक जीएसटी संकलनात 43 टक्के वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!