Tarun Bharat

व्हीटीयूमध्ये उद्यापासून विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शन

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक स्टेट कौन्सिल फॉर सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस कॅम्पस बेंगळूर व बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 व 13 रोजी राज्यस्तरावरील स्टुडंट प्रोजेक्ट प्रोग्रॅमचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. व्हीटीयूच्या परिसरात हे प्रदर्शन भरविले जाणार असून, त्यानिमित्त विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केएससीएसटीचे सेपेटरी एच. हेमंतकुमार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10.30 वा. होणार आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांच्या हस्ते उद्घाटन तर केएससीएसटीचे सेपेटरी प्रा. अशोक रायचूर यांच्या उपस्थितीत असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. करीसिद्धप्पा उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि. 13 रोजी दुपारी 2.30 वा. प्रदर्शनाची सांगता होणार आहे. या प्रदर्शनावेळी सेमिनार, परीक्षकांकडून पाहणी, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रोजेक्टचे प्रदर्शन, प्रा. अमृत भारद्वाज यांचे टेक्निकल व्याख्यान व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण अशी या कार्यक्रमाची रुपरेषा असल्याचे कुलगुरु करीसिद्धप्पा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकडे तांत्रिक कौशल्य आहेत. त्यांच्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामुळे इनोव्हेशन करणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यभरातील इंजिनियरिंग विद्यार्थ्यांच्या 5 हजार 191 प्रकल्पांपैकी 190 प्रकल्प प्रदर्शनात मांडले जाणार आहेत.

या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रदर्शन प्रेरणादायी ठरणार असल्याचे रजिस्ट्रार प्रा. आनंद देशपांडे यांनी सांगितले. मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. रंगास्वामी बी. ई. यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्षपदी निखिल कत्ती

Patil_p

ओंकारनगरमध्ये सांडपाण्यामुळे रहिवासी हैराण

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स के. रत्नाकर शेट्टी चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी वकिलांचे आजही कामबंद आंदोलन

Rohan_P

कागवाडमध्ये 39 गुंठय़ात 120 टन उसाचे उत्पादन

Patil_p

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!