Tarun Bharat

बुलकमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे

प्रतिनिधी/ बेळगाव

बुलकच्या बैठकीत वाङ्मय चर्चा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील या वषीच्या वक्तृत्व स्पर्धेतील शालेय आणि महाविद्यालयीन गटातील विजेत्यांनी आपली भाषणे सादर केली.

महाविद्यालयीन गटातील विद्यार्थिनी, सायली तुपारे (ज्योती कॉलेज), रझिया सनदी (ज्योती कॉलेज) यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक तर शालेय गटातील अक्षरा देसाई (ठळकवाडी हायस्कूल) यांनी देखील पारितोषिक प्राप्त केले आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, ‘चाय पे चर्चा’ सत्रात वक्तृत्व स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, श्रोत्यांचा प्रतिसाद, आयोजक संस्था या सर्व घटकांवर उपस्थित श्रोत्यांनी चर्चा केली. वाङ्मय चर्चा मंडळाचे स्पर्धा आयोजक माधव कुंटे, ग्रंथालयाचे चैतन्य हलगेकर, रोहन दळवी, प्रा. हिमांगी प्रभू, जगदीश कुंटे, सुधीर जोगळेकर आदींनी आपले विचार मांडले. क्लबचे अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी  आभार मानले.

Related Stories

मंगळवारी जिल्हय़ात 8 रुग्ण पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

शेतकऱयांचे खासदारांविरोधात आंदोलन

Amit Kulkarni

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेला विज्ञान स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

केएसआरटीसी बस आणि कँटरचा भीषण अपघातात विध्यार्थ्यांच्या शरीराचे दोन हिस्से

Rohit Salunke

तालुक्यातील सीमेवर तीन चेकपोस्ट

Patil_p

जवान देशिंगे यांच्यावर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni