बेळगाव / प्रतिनिधी
वर्षातील दुसऱयांदा चंद्रग्रहण मंगळवारी लागले होते. बेळगावातून पूर्णपणे चंद्रग्रहण निदर्शनास आले नाही. मात्र सायंकाळी 6 वाजता लागलेल्या चंद्रग्रहणाचा अनुभव एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला. महाविद्यालयाच्या आवारात दुर्बिनिच्या सहाय्याने चंद्रग्रहणाची माहिती प्राध्यापक राजशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण थेट पाहू नये असे सांगण्यात येते. मात्र वैज्ञानिक दृष्टय़ा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना चंद्रग्रहणाची माहिती देण्याचे नियोजन एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. चंद्रग्रहण काळात विविध पथ्य पाळले जाते. काहीवेळा उघडय़ा डोळय़ांनी ग्रहण पाहू नये असे सांगण्यात येते. पण मंगळवारी लागलेले ग्रहण बेळगावमधून पूर्णपणे पाहता आले नाही. मात्र चंद्राला झालेला स्पर्श दुर्बिनिच्या सहाय्याने पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विभागाच्या इमारतीवर ही सोय करण्यात आली होती. यावेळी विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी चंद्रग्रहणाची माहिती जाणून घेतली.
मंगळवारी सायंकाळी 5.58 वा. चंद्रगहणास प्रारंभ झाला. 7.26 वा. पर्यंत चंद्रग्रहण सुरू होते. यानंतर आता 2025 मध्ये चंद्रग्रहण होणार असल्याची माहिती सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे प्रमुख प्रा. राजशेखर पाटील यांनी दिली. हे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी, एस. एस. एज्युकेशन सोसायटीचे सेपेटरी के. बी. हिरेमठ, प्रा. प्रमोद आदिंसह विद्यार्थ्यांनी चंद्रग्रहण अनुभवला.