पॉलिटेक्निक प्रवेशासाठी झुंबड : रात्री 1.30 पर्यंत प्रवेश प्रक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये माफक फी असल्यामुळे विद्यार्थी पहिले प्राधान्य या कॉलेजला देत आहेत. गर्दी अधिक असल्यामुळे रात्री 1.30 वा. पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालली. यावषी विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स या विभागांकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात बऱयाच घडामोडी घडल्या. याचा परिणाम शिक्षण विभागावरही होताना दिसत आहे. कोरोनानंतर मेकॅनिकल व सिव्हिल या दोन शाखांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाले आहे. याचाच परिणाम पॉलिटेक्निक प्रवेशावरही होत आहे. यावषी इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स या दोन शाखांमध्ये प्रवेश वाढले आहेत.
सरदार्स हायस्कूलसमोरील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी झुंबड होती. रात्री उशिरापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालली. जिल्हाभरातून विद्यार्थी प्रवेशासाठी दाखल झाले होते. खासगी कॉलेजच्या तुलनेत सरकारी कॉलेजमध्ये फी कमी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा सरकारी कॉलेजकडे असल्याचे दिसून आले.