विशाल पट्टणशेट्टी : जीआयटीमध्ये स्टार्टअप् कॉन्क्लेव्हचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
स्टार्टअप् कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि करिअरच्या संधी याबद्दल स्टार्टअप् कॉन्क्लेव्ह जीआयटीमध्ये घेण्यात आली. याचे उद्घाटन वायव्य लॅब्जच्या सहसंस्थापक उमा बोंदडा यांनी केले. त्यांनी छोटय़ा कंपनीमध्ये आपले करिअर सुरू करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षस्थानी असलेले एस.व्ही.पी. केमिकल्सचे विशाल पट्टणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेची कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यानंतरच्या सत्रात हैद्राबादचे अजय राऊल, बेंगळूरचे अभिषेक लठ्ठे व अनिकेतन, बेळगावचे अमित पाटील या विविध कंपन्यांमध्ये सीईओ म्हणून काम करणाऱया मान्यवरांनी स्टार्टअप्मध्ये संधी शोधणे, त्यासाठीची आवश्यक कौशल्ये, आपला दृष्टिकोन, पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करणे अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
प्रारंभी सतीश हुक्केरी यांनी परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. जे. के. कित्तूर यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. एस. एफ. रॉड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर यांनी जीआयटीमध्ये असलेल्या इकोसिस्टीमचा स्टार्टअप्साठी उपयोग करण्याचा सल्ला दिला. वाणी हुंदेकर यांनी आभार मानले.