Tarun Bharat

खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक

जि.पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /बेळगाव

विद्यार्थ्यांना खेळांमध्ये प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. कारण खेळांमुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते. शरीराची योग्य वाढ होते. याचबरोबर अभ्यासामध्ये देखील ते प्रगती करत असतात. यासाठीच बेळगाव जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग आणि स्वामी विवेकानंद युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक राज्य युवा धोरण 2021 आखण्यात आले असून त्याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.

जिल्हा पंचायत सभागृहात विभागीय स्तरावरील बैठक घेण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन म्हणाले, मुले 12 वर्षांची झाल्यानंतर त्यांनी बास्केटबॉल, व्हॉलिबॉलसारखे खेळ खेळले पाहिजेत. त्यावेळी त्यांना चांगला आहार दिला पाहिजे. त्यामुळे त्यांची उंची देखील वाढेल, असे सांगितले. यावेळी त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

आम्ही फक्त खेळाला प्रोत्साहन देणे तसेच मुलांना त्यामध्ये सामावून घेऊन त्यांना त्याबद्दल प्रोत्साहित करणे, हे काम केले पाहिजे. लहानपणापासून मला व्हॉलिबॉल, फुटबॉल आणि क्रिकेटचे वेड होते. या सर्व स्पर्धांसाठी मी राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलो, असेही ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पावसात देखील आम्ही टेनिस बॉल आणि चिखलात क्रिकेट खेळत होतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण मिशन आश्रमाचे स्वामी मोक्षात महानंद स्वामीजी होते. स्वामी विवेकानंद युथ मुव्हमेंटचे प्रादेशिक प्रमुख जयंता के. एस., युनिसेफचे प्रादेशिक समन्वयक पी. राघवेंद्र भट्ट, उपसमन्वयक बसवराज मिलन्टी, राज्य युवा धोरण पॅनल सदस्य शेट्टर उपस्थित होते.

Related Stories

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱयांची बैठक

Amit Kulkarni

शगणमट्टी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

अकरा भटकी जनावरे दिवसभरात बंदिस्त

Amit Kulkarni

ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामात व्यत्यय

Omkar B

लाल-पिवळय़ाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय

Patil_p

रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त रिक्षाचालकांना मार्गदर्शन

Amit Kulkarni