Tarun Bharat

विद्यार्थ्यांनी खेळाकडेही लक्ष देण्याची गरज : आमदार बेनके

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सध्याच्या तांत्रिक युगात विद्यार्थी व्यसनाकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे मोबाईलमुळे विद्यार्थी खेळाकडे पाठ फिरवित असल्यामुळे त्यांची शारिरीक क्षमता दुर्बल होत चालली आहे. त्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण खात्यानेच खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक व वैचारिक क्षमता वाढते. याचा फायदा त्यांना पुढील जीवनात होतो. त्यासाठी अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार अनिल बेनके यांनी केले.

जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी डी. एस. डिग्रेज, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अप्पू कातरकी, शहर अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, शहर पीईओ जे. बी. पटेल, माजी पीईओ एल. बी. नाईक व इतर तालुक्मयातील पीईओ उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. विविध तालुक्मयातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. डी. एस. डिग्रेज यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. भूषण पाटील, सृष्टी जुवेकर, स्वयं जुवेकर, श्रवण मुतकेकर यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. सिद्दरामेश्वरची विद्यार्थिनी प्रज्ञा हिने सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. पाहुण्यांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत पहिल्या दिवशी ऍथलेटीक्सचे क्रीडाप्रकार घेण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हय़ातील विविध तालुक्मयातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. एस. पी. बडिगेर यांनी आभार मानले.

सकाळी झालेल्या प्राथमिक विभागाच्या स्पर्धेत सृष्टी जुवेकरने 600 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम कमांकासह मुलींच्या गटात वैयक्तिक विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात सेंट पॉल्सच्या जय ऍन्टोने 100, 200 व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.

Related Stories

चित्पावन, देशस्थ ऋग्वेदी, कऱहाडे ब्राह्मण संघातर्फे कोजागरी कार्यक्रम

Amit Kulkarni

शहर परिसरात बसवेश्वर जयंती साजरी

Patil_p

दोन दिवसात शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणार

Amit Kulkarni

चर्चेनंतरच शाळा-महाविद्यालये सुरू होणार

Patil_p

विसर्जन तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Amit Kulkarni

भाजपचा सौंदत्ती तालुक्मयात रॅलीद्वारे जोरदार प्रचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!