Tarun Bharat

आरसीयुसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

Advertisements

अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांमधून संताप

प्रतिनिधी/ बेळगाव

भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयु) मध्ये शनिवारी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय कार्यालयाला कुलूप घालून आंदोलन केले. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामुळे आरसीयु परिसरात गेंधळाची स्थिती दिसून आली. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना यावषी कमी प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. जेवढी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे त्यापेक्षा भरावी लागणारी फी अधिक आहे. त्यामुळे वाढीव फी विद्यार्थ्यांना भरावी लागणार असल्याचे परिपत्रक आरसीयुने विद्यार्थ्यांना बजावले. या निर्णयाविरुद्ध संतापलेल्या विद्यार्थ्यांनी थेट वर्गांवर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले.

मागील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु अद्याप विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा हे फिरकले नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे. विद्यार्थ्यांनी यावषी शिष्यवृत्तीमध्ये कपात का केली? असा प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Related Stories

असोगा रेल्वे स्टेशननजीकच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

Amit Kulkarni

कर्नाटकात २४ तासात आढळले पाच हजाराहून अधिक रुग्ण

Archana Banage

सिग्नेचर इलेव्हन, युनियन जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि अतिथि गृह बंद करण्याचे कोडगू प्रशासनाचे आदेश

Archana Banage

विमानतळ ते शहरापर्यंत फेरीबससेवेला मुहूर्त कधी?

Amit Kulkarni

म. ए. युवा समितीच्यावतीने शाहू महाराजांना अभिवादन

Omkar B
error: Content is protected !!