Tarun Bharat

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे

डॉ. कामत यांचे प्रतिपादन : सारस्वत समाजातर्फे आर्थिक साहाय्य वितरण

प्रतिनिधी /बेळगाव

सध्या समाजामध्ये वेगवेगळ्या कारणांनी व्यसनाधीनता वाढत आहे. तरुण वयात एकीकडे विद्यार्थी शिक्षणाकडे वळत असतात तर दुसरीकडे ते व्यसनांच्याही आहारी जातात. तंबाखू, सिगारेट, हुक्का, गुटखा, मद्य यासारख्या अंमलीपदार्थांचा स्वाद मजेखातर घेतला जातो. मात्र, ही व्यसने कायमस्वऊपी मानेवर बसतात. यामुळे आजार जडू शकतात. तऊणाईने अंमली पदार्थांपासून दूर राहत आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे विचार डॉ. सुधीर कामत यांनी व्यक्त केले.

गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर, बेळगाववतीने रविवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आर्थिक साहाय्य वितरण कार्यक्रम पार पडला. शहापूर येथील माऊती देवस्थान, सारस्वत भवन येथे हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कामत बोलत होते. व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष दिलीप तिळवे, विश्वस्त बालमुकुंद पत्की, आनंद वेलंगी, शिरीष सराफ, विकास कब्बे, संदीप कोलवालकर, यशश्र्री देशपांडे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कामत पुढे म्हणाले, व्यसनामुळे शरीराची हानी तर होतेच याचबरोबर सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. अपघात, वाढती वादावादी यामुळे आजूबाजूचे वातावरणही बिघडले जाते. त्यामुळे व्यसनापासून दूर राहणे यातच खरा शहाणपणा आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या मदतीमुळे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाची ही जाण ठेवत पुढील काळात आपणही समाजासाठी असेच कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुऊवात दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्ष दिलीप तिळवे यांनी प्रास्ताविक केले. विकास कब्बे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेली देणगी जाहीर केली. अपर्णा वेलंगी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. बेळगाव परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली. सूत्रसंचालन संध्या सडेकर यांनी केले. यावेळी गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील मान्यवर व ज्ञाती बांधव उपस्थित होते.

Related Stories

टेम्पो-ट्रक्टर अपघातात 1 ठार

Patil_p

वातानुकूलित बससेवेच्या महसुलात वाढ

Amit Kulkarni

प्राण्यांवर अंत्यक्रियेसाठी जागेची मागणी

Amit Kulkarni

पश्चिम भागात मळणी हंगामाला सुरुवात

Amit Kulkarni

रामतीर्थनगर येथे भरदिवसा घरफोडी

Amit Kulkarni

रखवालदाराच्या खुनाचे गुढ कायम

Patil_p