डॉ. कौशल रेगे यांचे आवाहन : जीएसएस कॉलेजमध्ये व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
संशोधन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नवनवीन संधींचा लाभ घेण्याची गरज आहे. मी स्वतः इंजिनिअर असूनही केमिस्ट्री व बायोलॉजी यांची सांगड घालत ह्यूमन जीनोम या प्रोजेक्टवर संशोधन केले आहे. सध्या मी कॅन्सर रोगाच्या निवारणार्थ कॅन्सर पेशींवर काम करत आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध विषयांचे ज्ञान एकत्र आणून नाविन्यपूर्ण शोध लावण्याची गरज असल्याचे मत डॉ. कौशल रेगे यांनी व्यक्त केले.
जीएसएस कॉलेजमध्ये असलेल्या करियर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेल या क्लबच्यावतीने ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे कार्यरत असलेले बेळगावचे डॉ. कौशल रेगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी बेळगाव ते अमेरिकापर्यंतचा प्रवास उलगडला. अध्यक्षस्थानी एसकेई सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू होते. प्राचार्य बी. एल. मजुकर यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.
प्रा. प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. संदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रसाद देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मयुरी रेगे, डॉ. मिसाळ, प्रा. अवधूत माणगे व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.