Tarun Bharat

सिंधुदुर्ग महाविद्यालयात अंमली पदार्थ सेवन न करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मालवण/प्रतिनिधी-

दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरुपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली.या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या e pledge अभियान व नोंदणी विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही, तसेच त्यांच्या दुष्परिणामांची जाणीव सर्वांना करून देईन, अश्या आशयाची शपथ देण्यात आली. महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी ही शपथ सर्वांना सांगितली. या अभियानामध्ये महाविद्यालयातील द्वितीय आणि तृतीय वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे  बारावीचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रा. कैलास राबते, डॉ. डी. व्ही. हारगीले, डॉ. एम आर खोत, ग्रंथपाल संग्रामसिंह पवार, डॉ. उर्मिला मेस्त्री, प्रा. शंकर खोबरे, प्रा. बेळेकर, प्रा. निकिता राऊळ, प्रा. रश्मी राऊळ, प्रा. निकिता कोचरेकर, प्रा. नताशा राणे, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापुरकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी पोलीस दलातील श्री. मोहन पेडणेकर, आणि श्री.उन्मेष पेडणेकर  यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि कॉमर्स असोसिएशनच्या वतीने ह्या अभियानाचे आयोजन करण्यात आले.Attachments area

Related Stories

बांदा येथे दोन परप्रांतीय कामगारांच्या गटात हाणामारी

Anuja Kudatarkar

शासकीय अहवाल पा?झिटिव्ह, खासगी अहवाल निगेटिव्ह!

Patil_p

अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण

Anuja Kudatarkar

चिपळूणचा मोरे, राजापूरचा कदम ठरला ‘राजापूर श्री 2022’चे मानकरी

Patil_p

आगीत फळबागेचे पावणेतीन लाखाचे नुकसान

Patil_p

कणकवली पंचायत समिती सदस्य सुभाष सावंत यांचे निधन

Anuja Kudatarkar