राहुल गावस यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय सणांकडे केवळ सांस्कृतिकदृष्टय़ा न पाहता त्यांचा शास्त्राrय व वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास करा असे आवाहन राहुल गावस यांनी विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना केले. मकर संक्रमणाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मकरसंक्रांती या सणाबद्दल शास्त्राrय, भौगोलिक माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य दामोदर मार्दोलकर, कार्यक्रम संयोजिका श्रेया काळे व्यासपीठावर उपस्थित होते.
या सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सूर्यशक्ती आणि जीवन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रियांका नार्वेकर, द्वितीय क्रमांक प्रिया अमेरकर व तृतीय क्रमांक विधी कासकर यांना प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला करूणा व कृतिका मावळींगकर, यश आंगणे, दिप्तेज रिवोडकर व सत्यम नाईक यांनी गीत सादर केले. श्रेया काळे यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र जोशी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सेजल परब हिने आभार मानले व आयुषी नेमलेकर हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता प्रिया अमेरकर यांच्या शांतीमंत्राने झाली. तिळगूळ देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.