Tarun Bharat

निमरत कौरच्या बॅगमधून सामानाची चोरी

अभिनेत्रीने अमेरिकन एअरलाइन्सला फटकारले

अभिनेत्री निमरत कौर डेल्टा एअरलाइन्सने डेट्राइट येथून मुंबईत परतत असताना तिच्या बॅगमधील सामानाची चोरी झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत एअरलाइन्सबद्दलचा संताप व्यक्त केला आहे.

डेल्टा एअरलाइन्स आता भारतात ऑपरेशनल नसल्याचे कळले आहे. याचमुळे या विषयावर तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण येथे उपस्थित करत आहे. याचमुळे ही तणावपूर्ण स्थिती दूर करण्यासाठी माझी मदत करा असे निमरतने ट्विटरवर एअरलाइन्सला उद्देशून म्हटले आहे.

कॅन्सल अन् डिलेड फ्लाइटमुळे सुमारे 40 तासांपर्यंत चालेल्या एका प्रदीर्घ प्रवासानंतर मुंबईत पोहोचले. विमानतळावर चेक इन बॅग गायब असल्याचे आढळून आले. जी बॅग मला मिळाली आहे ती तुटलेली आहे. ती तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे निमरतने नमूद केले आहे.

अभिनेत्रीच्या ट्विटवर डेल्टा एअरलाइन्सने प्रतिसाद दिला आहे. आमचा प्रतिनिधी तुम्हाला याप्रकरणी पूर्ण मदत करणार असल्याचे एअरलाइन्सने अभिनेत्रीला उद्देशून नमूद केले आहे. निमरत यापूर्वी अभिषेक बच्चन अन् यामी गौतम यांच्यासोबत ‘दसवी’ चित्रपटात दिसून आली होती. निमरत हॉलिवूडमध्ये देखील झळकली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय शो ‘होमलँड’मध्ये तिने काम केले आहे.

Related Stories

कॉप युनिर्व्हसमध्ये शिल्पा शेट्टीची एंट्री

Patil_p

हिरो नंबर 1 गोविंदा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर

Tousif Mujawar

‘वागले की दुनिया’च्या कलाकारांची शूटिंगनंतर धमाल

Patil_p

गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर सादर

Patil_p

अभिषेक बच्चन याची कोरोनावर मात!

Tousif Mujawar

सल्या – लंगडय़ाचा फ्री हिट दणका

Patil_p
error: Content is protected !!