Subhash Dalvi of Wilwade has d. Tech degree
मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांनी केले अभिनंदन
विलवडे गावचे सुपुत्र असलेले मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी तथा पालिकेच्या ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांना ब्रिटिश नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन मेरी या विद्यापीठाने “पर्यावरण आणि शाश्वत घनकचरा व्यवस्थापन” या विषयात डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ( डी टेक ) ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. ही मानाची पदवी मिळविणारे ते महापालिकेचे पहिले अधिकारी आहेत .
सुभाष दळवी यांना ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचामहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
ओटवणे / प्रतिनिधी