कुद्रेमनी येथील नागरिकांचे ग्राम पंचायतीला निवेदन
वार्ताहर /कुद्रेमनी
मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यात यावीत, असे निवेदन कुद्रेमनी येथील नागरिकांनी ग्राम पंचायतीला मंगळवारी दिले आहे. गावातील सर्व नागरिक मराठी भाषिक आहेत. कन्नडमधून देण्यात येणारी घरपट्टी पावती, घराचे उतारे आदी कागदपत्रे नागरिकांना समजत नाहीत. त्यामुळे कागदपत्रे नागरिकांना समजणाऱया त्यांच्या मराठी भाषेतून देण्यात यावीत. मराठीतून नागरिकांना कागदपत्रे देण्याचा ठराव ग्राम पंचायतीने करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका नाईक, उपाध्यक्ष विनायक पाटील, सदस्य शांताराम पाटील, अरुण देवण, संजय पाटील, शिवाजी मुरकुटे, पीडीओ लीला मेस्त्री, सचिन किल्लेकर आदींकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. निवेदनावर दीडशेपेक्षा अधिक नागरिकांच्या सहय़ा आहेत.
ग्रा. पं. माजी सदस्य ईश्वर क. गुरव, अर्जुन ह. जांबोटकर, नागेश राजगोळकर, लक्ष्मण पन्हाळकर, यल्लाप्पा धामणेकर, मारुती बडसकर, हेमंत पाटील, राजू धामणेकर, मल्लाप्पा पाटील, जोतिबा ता. पाटील, दत्ता कांबळे, मल्लाप्पा निं. पाटील आदी नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
मराठीतून कागदपत्रे मागणीचा अधिकार आमचा
यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर म्हणाले, गावात 100 टक्के मराठी नागरिक आहेत. लाईट बील, घराचे उतारे, घरपट्टी कागदपत्रे कन्नडमधून देत असल्यामुळे त्यामध्ये नेमकं काय आहे ते समजत नाही. मातृभाषा मराठीतून कागदपत्रे मागणीचा आमचा अधिकार आहे, त्याची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.