क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या वायफाय चषक राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत काकतीच्या साई तायक्वांदो संघटनेने 3 सुवर्ण, 2 कांस्य तर फुंगसेमध्ये 1 सुवर्ण, 4 कांस्यपदके पटकावून घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत जोतिबा सुतारने 50 किलो वजनी गटात सुवर्ण, शोभा सुतकट्टीने 45 किलो वजनी गटात रौप्य, ओम सुनील सुरेकरने 40 किलो वजनी गटात रौप्य, जोतिबा केदारी नागवडेकरने 45 किलो वजनी गटात रौप्य, नारायण बेटगेरीने 50 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या तायक्वांदोपटूंना प्रशिक्षक राजू केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.