बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठा मंडळ इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस ऍण्ड रिसर्च सेंटर बेळगाव यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. एम. एम. सायनेकर ज्वेलर्स यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेसाठी पलाश कलघटगी, लक्ष्मीनारायण मुदलीयार, तेजस पाटील, प्रांजल पिंटो, हर्षल पाटील, ऋषीकेश शहापूरकर, सुजल गावडे आणि आकाश नंबोजी या जीएसएस पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या दोन्हीही स्पर्धेत विशेष यश मिळविल्याबद्दल प्राचार्य बी. एल. मजुकर आणि प्राध्यापक वर्गांनी स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.