Tarun Bharat

सागरी जलतरण स्पर्धेत आबा-हिंद क्लबचे यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

विजयदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्यावतीने सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग वाघोटन खाडीवरती आयोजित केलेल्या स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूनी 2 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य अशी 5 पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे.

विजयदुर्ग येथील आयोजित केलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत 5, 3 व 2 किमी मुला-मुली आणि मास्टर्स गट याशिवाय 1 किमी व 500 मी मुला-मुलींसाठी अशा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. स्मरण मंगळूरकरने मुलांच्या वरिष्ट गटात 3 किलोमीटरची स्पर्धा 33.48 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर धवल  हनमण्णावरने मुलांच्या ज्युनिअर  गटांमध्ये 3 किमीचे अंतर 36.29 मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला.

श्रे÷ा रोटीने मुलींच्या ज्युनियर गटांमध्ये 3 किमीचे अंतर 39.46 मिनिटात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. सब ज्युनियर मुलींच्या गटामध्ये दिशा होंडीने 2 किमीच्या अंतर 16.22 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळविला. आरोही चित्रगारने 1 किलोमीटर लहान मुलींच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक  मिळविताना 11.32 मिनिटांची वेळ नोंदवली. युवराज मोहनगेकरने 2 किमीच्या मुलांच्या स्पर्धेत 17.25 वेळेत चौथा क्रमांक पटकावला. राधिका मोहनगेकर, सुमेध गडकरी, वर्धन नाकाडी यांनी देखील या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली.

वरील सर्व विजेत्या जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन तसेच क्लबचे पदाधिकारी श्रीमती शुभांगी मंगळूरकर व श्री सुनील हनमण्णावर यांचे प्रोत्साहन लाभते.

Related Stories

खानापूरात लॉकडाऊनचे नियम अधिक कडक

Patil_p

बेळगुंदी येथे तीन दुकाने फोडली

Patil_p

पक्षकारांना तातडीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करा!

Tousif Mujawar

ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.देवयानी देशपांडे यांचे निधन

Patil_p

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Patil_p

निर्जंतुकीकरण औषध फवारणीसाठी वाहनाची चाचणी

Patil_p