Tarun Bharat

राष्ट्रीय वयस्करांच्या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

नाशिक येथे राष्ट्रीय वयस्करांच्या ऍथलेटिक स्पर्धेत बेळगावच्या वयस्कर क्रीडापटूनी यश संपादन केले आहे. नाशिक येथे मिनाताई ठाकरे क्रिडांगणावर आयोजित राष्ट्रीय वयस्करांच्या क्रीडा स्पर्धेत वसंत जाधव यांनी 85 वर्षावरील गटात गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, हतोडाफेकमध्ये प्रथम क्रमांक, भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. मारुती कणबरकर 75 वर्षावरील गटात 3 किमी वॉक स्पर्धेत प्रथम क्रमांक, धोंडिराम शिंदे यांनी 75 वर्षावरील गटात 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, 1500 मी. धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. सुरेश देवरमनी यांनी 70 वर्षावरील गटात 10 किमी धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, 5 किमी वॉक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. बाळकृष्ण बेळगुंदकर यांनी 65 वर्षावरील गटात भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.

Related Stories

सुन्नाळ येथे सरकारी प्रौढ शाळेचे भूमिपूजन

Patil_p

चार महिने पूर्ण, तरीही सर्व्हरची समस्या जैसे थे

Amit Kulkarni

‘आनंदासाठी शिक्षण’ संकल्पना रुजविण्याची गरज

Amit Kulkarni

सोशल मीडिया हाताळताना खबरदारी आवश्यक

Amit Kulkarni

रिपरिप पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान

Patil_p

कणकुंबीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांना पिटाळले

Amit Kulkarni