26 सुवर्ण, 8 रौप्य, 3 कांस्य एकूण 37 पदकांची लयलूट
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आसाम गोहाटी येथे 22 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी 26 सुवर्ण, 8 रौप्य, 3 कांस्य एकूण 37 पदकांची लयलूट करुन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये 14 राष्ट्रीय विक्रम नोंदविले आहेत.
गोहाटी येथील डॉ. जाकिर हुसेन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या या पॅरा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत संपूर्ण देशातून पॅरा 500 जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यात बेळगावच्या अनिकेत पिळणकरने एस 5 विभागात फिजिकल चॅलेंज गटात 100 मी. फ्री स्टाइल, 50 मी. फ्री स्टाइल, 50 मी. बटरफ्लाय या तिन्ही प्रकारात 3 सुवर्ण तर त्याला उत्कृष्ट जलतरणपटूचा खास पुरस्कार देण्यात आला.
सिमरन गौडाडकरने एस 6 गटात 50 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. बॅकस्ट्रोक व 200 मी. वैयक्तिकमध्ये 3 सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदविला. शरण्या कुंभार हिने एस 14 गटात 100 मी. फ्री स्टाइलमध्ये सुवर्ण, 200 मी. फ्री स्टाइल सुवर्ण पदकासह राष्ट्रीय विक्रम तर 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, प्रज्वल नेर्लेकरने एस 12 अंध गटात 50 मी., 100 मी. फ्री स्टाइल, 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात 3 सुवर्णपदक, पृथ्वी नेर्लेकरने एस 13 अंध गटात 100 मी. व 50 मी. फ्री स्टाइलमध्ये 2 सुवर्ण, 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदकासह राष्ट्रीय विक्रम, स्वातीक पाटीलने एस 10 फिजिकल चॅलेंज गटात 50 मी. ब्रेस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 100 मी. ब्रेस्ट्रोकमध्ये रौप्य पदक, 200 मी. वैयक्तिक मिडले व 4 बाय 100 मी. फ्री स्टाइल रिलेमध्ये 2 सुवर्ण पदक तर 4 बाय 100 मी. आयएम रिलेमध्ये रौप्य पदक, राघवेंद्र अन्वेकरने एस 6 गटात 50 मी. ब्रेस्ट्रोक, 100 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये 2 सुवर्ण तर 50 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य पदक, श्रीधर माळगीने एस 8 गटात 50 मी., 100 मी. फ्री स्टाइल, 200 मी. आयएम, 4 बाय 100 मी. फ्री स्टाइल रिले 4 सुवर्णपदक तर 4 बाय 100 मी. आयएम रिलेमध्ये रौप्यपदक, श्रीकांत देसाई एस 5 गटात 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, 50 मी. फ्री स्टाइलमध्ये कांस्यपदक, साहिल जाधवने एस 9 200 मी. वैयक्तिकमध्ये 100 मी. बटरफ्लायमध्ये 2 रौप्य, साहिल काजूकरने एस 8 गटात 100 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य, अमोल कांबळे एस 9 गटात 4 बाय 100 मी. रिलेमध्ये सुवर्ण, प्रशांत दडवाडकरने एस 7 गटात 50 मी. ब्रेस्ट्रोमध्ये रौप्य, 100 मी. ब्रेस्ट्रोमध्ये कांस्य तर सुमित मुतगेकर, योगेश पीटल, रामलिंग पार्लेकर, मारुती कोप्पद यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कोंडुसकर, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमुल्य मार्गदर्श लाभले.