Tarun Bharat

मिनी ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये डायनॅमिक क्लबच्या खेळाडूंचे यश

1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांची कमाई

क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव

बेंगळूर येथे युवजन क्रीडा खाते व मिनी ऑलिम्पिक संघटना कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱया मिनी ऑलिम्पिक ऍथलेटीक्स स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात बेळगावच्या विद्याभारती डायनॅमिक्स ऍथलेटीक्स क्लबच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले. स्वरा शिंदेने जलद धावपटूचा पुरस्कार
पटकाविला.

या ऍथलेटीक्स स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या डायनामिक ऍथलेटीक्स क्लबची खेळाडू स्वरा शिंदे हिने सुवर्णपदक पटकाविले. उंच उडीत श्रावणी पाटीलने रौप्य तर गोळाफेक स्पर्धेत रूद्रगौडा रावसाहेबने रौप्यपदक पटकाविले. या तिन्ही खेळाडूंना ऍथलेटीक्स प्रशिक्षक उमेश बेळगुंदकर, सुरज पाटील, संजीव नाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

साईश्री ला कांस्यपदक

14 वर्षाखालील ऍथलेटीक्स स्पर्धेत 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या साईश्रीने कांस्यपदक पटकाविले. साईश्री ही केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिला ऍथलेटीक्स प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, आकाश मंडोळकर यांचे मार्गदर्शन तर तीचे वडील राजू पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

मराठी साहित्यामध्ये स्त्री आत्मचरित्रांची मोठी भर

Amit Kulkarni

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोरोना संदर्भात बोलावली तातडीची बैठक 

Archana Banage

आयएमईआर-येळ्ळूर क्रॉस रस्त्याचे काम धिम्यागतीने

Omkar B

‘आलमट्टी’चे सर्व दरवाजे उघडले

Amit Kulkarni

कुडची फाटक बंदच, नागरिकांना फेरा

Omkar B

नंदिहळळीत शुभांगी भाताचे विक्रमी पिक

Omkar B