बेळगाव : जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रोग्रॅमिंग स्पर्धेत जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
जैन कॉलेजच्या एमसीए विभागातर्फे दि. 3 व 4 ऑगस्ट रोजी बीसीए व बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रोग्रॅमिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कॉलेजचे विद्यार्थी जोतिबा साळुंखे, किरण हलेण्णावर, चैत्रांजली केंचराहुत, श्वेता पांडे, साक्षी उत्तुरे या पाच विद्यार्थ्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य बी. एल. मजुकर व कॉम्प्युटर विभागाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळत आहे.