वार्ताहर /किणये
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व सह्याद्री को-ऑप. सोसायटी, बेळगाव आयोजित खेलोत्सव स्पर्धेत इदलहोंड येथील गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून साधना होसुरकरला गौरविण्यात आले.
द. म. शि. मंडळा आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत एकूण 34 शाळांनी सहभाग घेतला होता. या संघात कप्तान संगीता होसुरकर, साधना होसुरकर, रेखा बाचोळकर, समीक्षा निडगलकर, प्राजक्ता निडगलकर, तनिष्का पाटील, ऐश्वर्या कुंभार, ममता जाधव, अर्चना मडवालकर, श्रेया मडवालकर, मालाश्री पाटील, सम्रता पाटील, रसिका पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले. त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धेत साधना होसुरकर हिने लांबउडी आणि गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक तसेच 4ƒ100 मीटर रिले मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक तर लक्ष्मण नागेनहट्टीकर आणि नरसिंग पाटील यांनी अनुक्रमे 100 मीटर आणि 1500 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक
पटकाविला.