बेळगाव : गंगावती, कोप्पळ येथे पाचव्या निमंत्रितांच्या ऑल इंडिया कराटे स्पर्धेत येथील इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंनी 4 सुवर्ण, 4 रौप्य व 3 कांस्यसह एकूण 11 पदके पटकावत सुयश संपादन केले.
या स्पर्धेत अमिषा होनगेकरने, संकेत चौहान, संजना चित्ताप्पचे, प्रदीप मारिगौदर यांनी सुवर्ण, प्रतीक्षा मारिगौदर, प्रतीक्षा सोबरदर, यश कारेगर, स्वप्निल नाईक यांनी रौप्य, सिहीली गुंडकल, आचल तुडयेकर, तेजस्विनी देसाई यांनी कांस्य मिळविले. त्यांना इंडियन कराटे क्लब बेळगाव आणि बेळगाव दिस्टक् स्पोर्ट्स कराटे असोसिशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, परशुराम काकती यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना कराटे प्रशिक्षक विनायक सिद्धाप्पा दंडकर, श्री जननी महिला मंडळ ग्रुप तहसीलदारचे प्रमुख स्वाती गणेश चौगुले यांचे सहाय्य लाभले आहे.