वार्ताहर /खानापूर
गुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत करंबळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या शाळेने मुलांच्या कबड्डीमध्ये प्रथम, तसेच मुलांचा व्हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळात ज्ञानेश्वर घाडीने 200 मीटर धावणे आणि 47 किलो गट कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक, बाळकृष्ण घाडीने 50 किलो गट कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक, तसेच मुलींच्या वैयक्तिक खेळात पूजा पाटीलने 600 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, समिक्षा पाटीलने 35 किलो गट कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवता तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. योगा क्रीडा प्रकारात मुलांच्या गटातून संकल्प घाडी, बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, नंदराज घाडी, कुणाल देवलतकर तर मुलींच्या गटातून ऋतुजा घाडी, पूजा पाटील, समीक्षा पाटील, निरंजना भोसले, प्रगती पाटील विजयी झाले असून तालुकास्तरीय योगा स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.