बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण खाते तर्फे घेण्यात आलेल्या झोनल पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत 15 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकासह घवघवीत यश संपादन केले.
किणये येथील सिध्दीविनायक इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे सलग दोन दिवस आयोजित विभागिय पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती, ज्युडो आणि कराटे या क्रीडा प्रकारांमध्ये खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या क्रीडापटूंनी तब्बल 15 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई केली. विभागीय पातळीवरील या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व क्रीडापटू तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
विभागीय पातळीवरील कुस्ती, कराटे व ज्युडो या स्पर्धेत साहिल नंदगडकर, अझान शरीफ मोहम्मद धामणेकर, जाहिद सय्यद, आदित्य सलाम, प्रथमेश बस्तवाडकर, स्वराज पाटील, आचल पाटील, भुवनेश्वरी, राधिका नेसरकर, श्रेया पाटील, भार्गवी सुतार, सुषमा शिंदे आणि अंकिता कंकणमेले या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी केली. या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापीका वनश्री नायर, संस्थेच्या अध्यक्ष राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत आहे. ज्ये÷ मल्ल अतुल शिरोळे आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर बेळगावच्या होतकरू कुस्तीपट्टुना मार्गदर्शन मिळत आहे.